Headlines

team

कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा.

शेतकरी-बैलांच्या अतूट नात्याला उजाळा; सजविलेल्या बैलांची गावातून मिरवणूक हॅलो जनता प्रतिनिधी जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सणानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सकाळी…

Read Full News

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात भव्य पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले; समाजाच्या आर्थिक एकजुटीतून उभे राहिले मंदिर व नवनिर्मित सभागृह.

शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता समाजबांधवांच्या वर्गणीतून उभारले वास्तू; नाभिक समाजाच्या अस्मिता व स्वाभिमानाचे ठरले प्रतीक हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव  भडगाव : संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भडगावातील नाभिक समाजात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले. येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत सेना महाराजांची पुण्यतिथी विविध धार्मिक…

Read Full News

जलजीवन योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक सोनवणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामासह कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात…

Read Full News

चौथ्या श्रावण सोमवारी कजगावात भाविकांना फराळ वाटप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : चौथ्या श्रावण सोमवार निमित्त कजगाव येथे भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. आदेश ग्रुप, कजगाव यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आदेश ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त…

Read Full News

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; देशभर तहसील कार्यालयांबाहेर आंदोलनाचा एल्गार.

भडगावात विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा. भडगाव, प्रतिनिधी : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच आगामी जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय पिछडावर्ग (ओबीसी) मोर्चाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील तहसील कार्यालयांबाहेर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग भडगाव तालुक्यातही…

Read Full News

जहागीर गोवाजी महाराज जयंतीनिमित्त पाचोऱ्यात विविध कार्यक्रम.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : वाल्मिकी व मेहतर समाज पाचोरा सकल मंचाच्या वतीने संत श्री जहागीर गोवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा पार पडली. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते तथा नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील, नगरसेवक सुमित सावंत, शरद पाटील यांच्यासह समाजातील…

Read Full News

राजमाता जिजाऊ बससेवेचा शुभारंभ.

सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व मान्यवरांची उपस्थिती.. हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी ( पाचोरा) पाचोरा : नागरिकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या बससेवेचे उद्घाटन सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी…

Read Full News

कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव. कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री…

Read Full News

काकनबर्डी येथे वृक्षसंवर्धनाचा उपक्रम; ४० रोपांना ठिबकद्वारे पाणी, एम.के. अ‍ॅग्रोतर्फे खत.

हॅलो जनता प्रतिनिधी गजानन गिरी  पाचोरा : काकनबर्डी, येथे १५ ऑगस्ट रोजी काकनबर्डी येथील खंडेराव महाराज देवस्थान परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील रोपांचे संवर्धन करण्यासाठी रविवारी (दि. ३०) विशेष उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील सुमारे ४० रोपांपर्यंत पाइपलाइन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्यात आले. तसेच एम.के. अ‍ॅग्रो प्रा. लि., नाशिक यांच्या तर्फे रोपांना आवश्यक खत देण्यात…

Read Full News

कजगाव नदीपात्रालगत स्वच्छता मोहिमेला सुरुवात; जेसीबीच्या सहाय्याने कचरा व झाडाझुडपे हटविण्याचे काम सुरू.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर  कजगाव, दि. २६ ऑगस्ट २०२६ : कजगाव परिसरातील नदीपात्रालगत वाढलेले गवत, झाडाझुडपे, साचलेला कचरा तसेच माती व इतर अडथळे हटवून परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राच्या बाजूचा भाग साफ करण्याचे काम सध्या सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडाझुडपे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे परिसर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION