हॅलो सामाजिक

काकनबर्डी येथे वृक्षसंवर्धनाचा उपक्रम; ४० रोपांना ठिबकद्वारे पाणी, एम.के. अ‍ॅग्रोतर्फे खत.

हॅलो जनता प्रतिनिधी गजानन गिरी 

पाचोरा : काकनबर्डी, येथे १५ ऑगस्ट रोजी काकनबर्डी येथील खंडेराव महाराज देवस्थान परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील रोपांचे संवर्धन करण्यासाठी रविवारी (दि. ३०) विशेष उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील सुमारे ४० रोपांपर्यंत पाइपलाइन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्यात आले. तसेच एम.के. अ‍ॅग्रो प्रा. लि., नाशिक यांच्या तर्फे रोपांना आवश्यक खत देण्यात आले.

वृक्षारोपण केल्यानंतर केवळ रोपे लावणे न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ठिबक सिंचनामुळे रोपांना नियमित व योग्य प्रमाणात पाणी मिळणार असून, त्यामुळे रोपांची वाढ होण्यास मदत होणार आहे.

हा उपक्रम खंडेराव देवस्थान काकनबर्डी, ओझर क्षत्रिय ग्रुप पाचोरा, अरमान फाउंडेशन पाचोरा, एम.के. अ‍ॅग्रो प्रा. लि. नाशिक, ग्रीन अर्थ फाउंडेशन पाचोरा, नंदकिशोर पाटील इलेक्ट्रिकल्स खेळगाव, गोतावळा ग्रुप, जन औषधी मेडिकल (कासार), शारदाई गोविंद समर्थ खेळगाव, ओझर ग्रामपंचायत ग्रुप, ओझर व अंतुर्ली विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.

यावेळी खंडेराव महाराज देवस्थान परिसरात शैलेन्द्र पाटील, संजय पाटील व अजय वाघ, ओझर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

उपक्रमास पप्पू राजपूत, सुनील पाटील (मार्केट कमिटी सदस्य), संजय पाटील, मंगेश समवंशी, सोपनील राजपूत, फैम शेख, बंडू मोरे, सुधाकर पाटील, अतुल पाटील (वाणेगाव), बाळू धुमाळ (निभोरी), नरेश पाटील (माहेजी), नगरसेवक राहुल गायकवाड, उमेश ए. रडे, यदनेश कासार, संजय मालचे, अजाबराव पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, एस.के. पाटील, शांताराम पाटील, किशोर पुराणिक, बाळू सोमवंशी, निलेश पाटील, गणेश परदेशी, सागर पवार, पिंटू जगताप, संजय कानडे, नितीन पाटील, अनिल परदेशी, सतीश परदेशी आदी उपस्थित होते.

तसेच पत्रकार बांधव चिंतामण पाटील, नंदू शेलकर, योगेश पाटील, संजय पाटील, गजानन गिरी आदींची उपस्थिती होती.

वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्याने या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button