हॅलो सामाजिक

जहागीर गोवाजी महाराज जयंतीनिमित्त पाचोऱ्यात विविध कार्यक्रम.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा 

पाचोरा : वाल्मिकी व मेहतर समाज पाचोरा सकल मंचाच्या वतीने संत श्री जहागीर गोवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा पार पडली.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते तथा नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील, नगरसेवक सुमित सावंत, शरद पाटील यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समाजबांधवांनी संत श्री जहागीर गोवाजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button