Headlines

team

१२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त १२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त !

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरांना मोठी घसरण हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर अवघ्या १२ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ३५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत असून बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची…

Read Full News

अटकेला ब्रेक! शालार्थ आयडी प्रकरणात विनोद तराळ यांना दिलासा.

  हॅलो जनता विशेष प्रतिनिधी नाशिक : शालार्थ आयडी प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना पदाधिकारी तथा माफदा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद रामदास तराळ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १६४/२०२५ प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर…

Read Full News

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सन्मान; स्थानिक महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे आवाहन जळगाव : जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या तीन महिला खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल व हॉकी जळगाव संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. मलेशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगाव चे नाव उंचावणाऱ्या हॉकी जळगावच्या हिमाली…

Read Full News

जळगावमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेखः लग्नसोहळ्यासाठी गावी आलेल्या 23 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून थेट शस्त्रांचा वापर करून जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच जळगाव तालुक्यातील बोरनार गावात एका 23 वर्षीय तरुणाची धारदार चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली….

Read Full News

कजगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक ? आठ ते दहा दिवसांत दहा जणांना लागण झाल्याची माहिती..!

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव, ता. भडगाव : गावातील अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबतच्या तक्रारींमुळे कजगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत अंदाजे दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर…

Read Full News

ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…

भडगाव (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वाक शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ८ वाजता अचानक छापा टाकत वाळू वाहतुकीशी संबंधित ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर अशी एकूण १२ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे परिसरातील…

Read Full News

दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके…

Read Full News

वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, २८…

Read Full News

कजगांव ग्रामपंचायतीच्या ठरावावर पंचायत समितीचा आक्षेप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव ग्रामपंचायतीने गट क्रमांक १३१/१/३३ मधील जमिनीबाबत केलेल्या ठराव व ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ मधील नोंदीच्या फेरफारावर पंचायत समिती भडगावच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे. सदर जमीन हस्तांतरणास बंदी असताना ग्रामपंचायत स्तरावर नमुना क्रमांक ८ मध्ये हस्तांतरणाची नोंद झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात…

Read Full News

गाळण बु. शिवारात बिबट्याच्या ठशांचे दर्शन ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

गाळण बु. (ता. पाचोरा) : येथील शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, शक्यतो समूहाने शेतात जावे. शेतात प्रवेश करताना मोठ्याने आवाज करावा तसेच आवश्यकतेनुसार फटाके फोडून बिबट्याची उपस्थिती…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION