हॅलो सामाजिक

चौथ्या श्रावण सोमवारी कजगावात भाविकांना फराळ वाटप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव 

कजगाव : चौथ्या श्रावण सोमवार निमित्त कजगाव येथे भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. आदेश ग्रुप, कजगाव यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आदेश ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी कजगाव येथील सर्व व्यापारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत भाविकांची सेवा केल्याबद्दल आदेश ग्रुपच्या उपक्रमाचे नागरिक व भाविकांकडून कौतुक करण्यात आले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी आदेश ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button