भडगाव उपबाजारात शेतमालाच्या लिलावाला सुरुवात ; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव
हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील.
मका, ज्वारी, हरभरा, गहू आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक भडगाव उपबाजारात होत असून, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आपला माल विक्रीसाठी आणत आहेत. व्यापाऱ्यांची उपस्थिती वाढल्याने शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यापारी-शेतकरी बैठकीत निर्णायक तोडगा; अडचणींना पूर्णविराम
बाजार समितीच्या वतीने भडगाव येथे शेतमालाचा लिलाव जलद गतीने होण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच वजन काट्यांची अचूक व्यवस्था, त्वरित पेमेंट प्रणाली यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे.
शेतकऱ्यांनी खासगी ठिकाणी शेतमाल विक्री करण्याऐवजी बाजार समितीच्या अधिकृत लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळून अधिकाधिक लाभ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी सभापती गणेश भिमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक लखीचंद प्रकाश पाटील, यासह मंडळाचे सदस्य, शेतकरी बांधव, व्यापारी बांधव तसेच बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.