पाचोरा किर्तन sohala

पाचोरा : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचा भक्तिमय सोहळा

पाचोरा (गजानन गिरी) : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात भव्य भक्तिमय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. झी टॉकीजवरील लोकप्रिय ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या युवा महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाचा आनंद भाविकांना अनुभवता येणार आहे. युवा सेना […]

सविस्तर वाचा
जळगाव जिल्हा बँक निवडणूक 2026

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची आघाडी! शिवसेनेच्या दोन, भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित

  जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महायुतीची आघाडी; ३ जागा बिनविरोध हॅलो जनता | प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश असून, तिन्ही जागांवर महिला उमेदवारांनी […]

सविस्तर वाचा

हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती संपन्न

हॅलो जनता न्यूज पाचोरा: येथील प्रसिद्ध ‘आई येडेश्वरी मित्र मंडळ – मांगवाड्याची महाराणी’ दुर्गात्सवात हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांनी सपत्नीक उपस्थित राहून देवीची मनोभावे महाआरती केली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या मंगल सोहळ्यात त्यांनी आदिमायेचे दर्शन घेऊन परिसरातील सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने गिरी दांपत्याचा सन्मान करण्यात आला. आरती […]

सविस्तर वाचा

कजगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक ? आठ ते दहा दिवसांत दहा जणांना लागण झाल्याची माहिती..!

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव, ता. भडगाव : गावातील अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबतच्या तक्रारींमुळे कजगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत अंदाजे दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर […]

सविस्तर वाचा
ST Bus Stop

ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!

हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…

भडगाव (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वाक शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ८ वाजता अचानक छापा टाकत वाळू वाहतुकीशी संबंधित ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर अशी एकूण १२ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे परिसरातील […]

सविस्तर वाचा
पाचोरा,

पाचोरा महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सत्ताधारी आमदारावर गंभीर आरोप…

पाचोरा प्रतिनिधी: तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाऊसाच्या खंडामुळे हवालदिल झालेला शेतकरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नसंदर्भात आयोजित आढावा बैठकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आढावा बैठकीचे निमंत्रण न दिल्याने भाजप नेते अमोल शिंदे यांनी स्थानिक आमदारांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे घटक पक्ष असूनही शिवसेना, […]

सविस्तर वाचा

दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके […]

सविस्तर वाचा

वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, २८ […]

सविस्तर वाचा

कजगांव ग्रामपंचायतीच्या ठरावावर पंचायत समितीचा आक्षेप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव ग्रामपंचायतीने गट क्रमांक १३१/१/३३ मधील जमिनीबाबत केलेल्या ठराव व ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ मधील नोंदीच्या फेरफारावर पंचायत समिती भडगावच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे. सदर जमीन हस्तांतरणास बंदी असताना ग्रामपंचायत स्तरावर नमुना क्रमांक ८ मध्ये हस्तांतरणाची नोंद झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात […]

सविस्तर वाचा