राजमाता जिजाऊ बससेवेचा शुभारंभ.

सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व मान्यवरांची उपस्थिती..
हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी ( पाचोरा)
पाचोरा : नागरिकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या बससेवेचे उद्घाटन सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष किशोर बारवकर आप्पा, नगरसेवक अशोक पुंडलिक पाटील, नगरसेवक सुमित सावंत, नगरसेवक रेहमान तडवी, नगरसेवक सतीश चेडे, शरदभाऊ, किशोर पाटील, बाळू पाटील, सलीम भाई, संतोष साठे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी आगार व्यवस्थापक मनोज भोई, वाहतूक निरीक्षक शुभम झडगे, मयूर काळे तसेच सहाय्यक कार्यशाळेचे योगेश पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू झाल्यामुळे नागरिक व प्रवाशांना प्रवासाची अधिक चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बससेवेच्या शुभारंभामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, नियमित व सुलभ सार्वजनिक वाहतुकीसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



