Headlines

कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….

हॅलो जनता (जामनेर) – जामनेर येथील कृषी विभागाच्या पथकाने फत्तेपूर येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली. यात काही विक्रेत्यांकडे अनियमितता आढळून आल्याने सहा दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीत फसवणूक होऊ नये, त्यांना निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जळगाव जिल्हा कृषी विभागाकडून जिल्हा कृषि अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात पथके नेमून कारवाई…

Read Full News

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून पाचोरा भडगाव मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यात लोकसभेत चांगले मताधिक्य मिळवून आमदार किशोर पाटील पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष यांनी विषम परिस्थितीत खिंड लढवत विजयश्री खेचून आणत चांगले मताधिक्य…

Read Full News

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

हॅलो जनता (दिली) – जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. कालच रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी त्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी पार पडल्यानंतर रक्षा खडसे यांना कोणत्या मंत्रालयाचा पदभार मिळेल याकडे खानदेशवाशी यांचं लक्ष…

Read Full News

पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….

हॅलो जनता (पाचोरा) – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरंगी, सामनेर यासह इतर गावांमध्ये केळी सह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर वरील केळी ही जमीनदोस्त झाली असून लिंबू, मोसंबी यासह इतर फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला…

Read Full News

Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) – दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, आज एकाच दिवसात सोने (Gold rate) एक हजार ४०० रुपयांनी घसरले. यामुळे सोन्याचे दर ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच १ जून रोजी सोन्याच्या भावात ४००…

Read Full News

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

हॅलो जनता (जळगाव) – रशियातील यारोस्लाव-द- वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय संहिता पूर्ण केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव (आय.एफ.एस) यांनी जिल्हा प्रशासनाला…

Read Full News

पर्यावरण दिनानिमित्त एन.एस.एस व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत २ हजार सीड बॉल चे रोपण….

हॅलो जनता (जळगाव) – औद्योगीक प्रशिक्षण संस्था जळगाव व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पर्यावरण दिनानिमित्त २ हजार सीडबॉल चे रोपण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे हे सीडबॉल स्वतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बनवले होते. तसेच वृक्षरोपण व वृक्ष लागवडीसाठी खड्डे पण खोदण्यात आले. हरित शहर सुंदर शहर हे बोधवाक्य घेऊन यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष रोपण करण्याचा स्वयंसेवकांना…

Read Full News

Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..

हॅलो जनता (जळगाव) – नात्यात लग्न होत नसल्याने कुटुंबाने लग्नाला विरोध केल्याने चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील प्रेमीयुगुलाने चाळीसगांव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दि. ७ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास चाळीसगाव आणि वाघळी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाचा पाय कापला…

Read Full News

What’s App : व्हाटसअ‍ॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा

हॅलो जनता (पाचोरा) – सोशल मीडियाचा शेतकऱ्याला फायदा झाला असून त्याचा चोरलेला बैल हा व्हाटसअ‍ॅप स्टेट्सच्या माध्यमातून सापडल्याची घटना ही घडली आहे. पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकर्‍याचा बैल अज्ञात चोराने रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्या शेतकर्‍याने तात्काळ व्हाट्सअप स्टेट्सवर बैलाचा फोटो ठेवुन बैल चोरीला गेल्याचे…

Read Full News

Weather update : महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…

हॅलो शेतकरी (मुंबई) – काल माॅन्सूनने राज्यात प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केला. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. तर पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सूनने काल राज्यातील सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला होता. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION