⁠हॅलो क्राईम

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

हॅलो जनता (जळगाव) – रशियातील यारोस्लाव-द- वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय संहिता पूर्ण केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव (आय.एफ.एस) यांनी जिल्हा प्रशासनाला कळवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री वोल्खोव्ह नदीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत असताना उसळलेल्या लाटांच्या प्रवाहात पाच जण बुडाले होते.

Russia Accident : जळगाव जिल्ह्यातील तिघांचा आहे समावेश…

त्यात जळगावच्या भडगाव मधील हर्षल अनंतराव देसले, अमळनेर येथील भावंडे जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी तिघांसह मलिक गुलामगोलस मोहम्मद याकूब (२०, मुंबई) व निशा भूपेश सोनवणे (२०, धुळे, हल्ली रा. पुणे) यांचा समावेश होता. घटनेच्या दुसऱ्यादिवशी हर्षलचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले होते. जिशान व जिया या भाऊ-बहिणींचा शोध लागत नसल्याने शुक्रवारी मॉस्कोहून एका विशेष पथकाने शोध मोहीम राबविली.

त्यानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले असून आंतरराष्ट्रीय संहिता पार पाडल्यानंतर मृतदेह भारतात आणण्यासाठी परवानगी मिळणार आहे. भारताचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांसह विद्यापीठासोबत समन्वयासह अन्य प्रक्रिया पूर्ण करीत असल्याचे दूतावास कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.

Russia Accident : नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार किशोर पाटील परराष्ट्र मंत्र्यालयाच्या संपर्कात…

खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार किशोर पाटील हे देखील केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चौघांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या विभागाच्या म्हणण्यानुसार रशियातील न्यायालयीनसह अन्य प्रक्रिया आणखी तीन दिवस चालणार आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर चौघांचे मृतदेह भारतात आणले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत मृतदेह भारतात येतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे वाघ यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

पर्यावरण दिनानिमित्त एन.एस.एस व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत २ हजार सीड बॉल चे रोपण….

Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..

What’s App : व्हाटसअ‍ॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button