⁠हॅलो शेतकरी

What’s App : व्हाटसअ‍ॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा

हॅलो जनता (पाचोरा) – सोशल मीडियाचा शेतकऱ्याला फायदा झाला असून त्याचा चोरलेला बैल हा व्हाटसअ‍ॅप स्टेट्सच्या माध्यमातून सापडल्याची घटना ही घडली आहे. पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकर्‍याचा बैल अज्ञात चोराने रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्या शेतकर्‍याने तात्काळ व्हाट्सअप स्टेट्सवर बैलाचा फोटो ठेवुन बैल चोरीला गेल्याचे सांगितले असता चोरीचा बैल काही तासातच जामनेर तालुक्यात सापडल्याची घटना घडली आहे.

पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना खुप वाढल्या असून होळ गावातील शेतकर्‍याचा बैल चोरीला गेल्याची दुसरी घटना आहे. अनिल गोविंदा चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातुन च्या मध्यरात्री चोरट्यांनी बैल चोरुन नेला. सकाळी शेतात गेल्यावर दोन बैलातुन एका बैलाची चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकरी चौधरी यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या मोबाईल वरील (What’s App) स्टेट्स वर बैलाचा फोटो ठेवुन शोधण्याचे व इतरांनी स्टेट्स ठेवण्याचे आवाहन संबंधीतांना केले.

What’s App : असा सापडला चोरीला गेलेला बैल….

यावरून त्यांचे नातेवाईक सह मित्र परीवाराने तात्काळ स्टेट्स ठेवल्याने सबंधित शेतकऱ्याच्या नातेवाईक असलेला विद्यार्थी कॉलेज ला जात असतांना जामनेर शहरातील एका कॉलनी भागात एका छोटा हत्ती ला एक लाल रंगाचा बैल बांधलेला दिसला त्याने तात्काळ त्याच्या नातेवाईकांना ही बाब कळवली असता जामनेर पोलीसांनी सदरच्या घटनास्थळी धाव घेऊन बैल बैलाला ताब्यात घेत शेतकऱ्याला परत केले आहे.

What’s App : पोलीसांनी सखोल चौकशी कॉंग्रेस ने केली मागणी

या चोरीच्या गुन्ह्य़ात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेऊन तालुक्यातील बैल चोरीचे वाढत्या घटना लक्षात घेऊन सापडलेल्या चोरा कडुन टोळी चा छडा लावण्यात यावा अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, सहायक फौजदार निवृत्ती मोरे,पो. हे. कॉ. विनोद पाटील पो. कॉ. अमोल पाटील, दिनेश पाटील, कमलेश पाटील, आदी तपास करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

Weather update : महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…

Dhule : गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

Big Breaking : गिरीश महाजन (Girish mahajan) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार? जळगावात राजकीय चर्चांना उधाण….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button