हॅलो बाजारभाव

Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) – दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, आज एकाच दिवसात सोने (Gold rate) एक हजार ४०० रुपयांनी घसरले. यामुळे सोन्याचे दर ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच १ जून रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. त्यात पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार १०० रुपयांवर पोहोचले होते. त्यात आज थेट एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ७१ हजार ५०० रुपये (Gold Rate) प्रतितोळ्यावर आले.

दुसरीकडे दोन दिवसांत तीन हजार ६०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..

Weather update : महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button