हॅलो राजकारण

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

हॅलो जनता (दिली) – जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. कालच रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी त्यांचा शपथविधी पार पडला.

शपथविधी पार पडल्यानंतर रक्षा खडसे यांना कोणत्या मंत्रालयाचा पदभार मिळेल याकडे खानदेशवाशी यांचं लक्ष लागलेलं होतं शपथविधी झाल्यानंतर आज ना. रक्षा खडसे यांना मंत्रालयाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान हे असून त्यांच्या सोबत रक्षा खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून आज त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….

Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button