पाचोरा : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचा भक्तिमय सोहळा
पाचोरा (गजानन गिरी) : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात भव्य भक्तिमय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. झी टॉकीजवरील लोकप्रिय ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या युवा महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाचा आनंद भाविकांना अनुभवता येणार आहे.

युवा सेना शहरप्रमुख सूरज आबा शिंदे यांच्यातर्फे या विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ८ वाजता कृष्णापुरी येथील हनुमान मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
शिवलीला ताई पाटील या आपल्या ओघवत्या वाणीने, भक्तिरसपूर्ण निरूपणाने आणि प्रभावी कीर्तनशैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जातो. त्यामुळे या कीर्तन सोहळ्याबाबत परिसरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या भक्तिमय कार्यक्रमाला पाचोरा शहरासह परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक युवा सेना शहरप्रमुख सूरज आबा शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
स्थळ : हनुमान मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा
दिनांक : सोमवार, २ नोव्हेंबर
वेळ : सायंकाळी ठीक ८ वाजता
आयोजक : सूरज आबा शिंदे, युवा सेना शहरप्रमुख




