पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….
हॅलो जनता (पाचोरा) – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरंगी, सामनेर यासह इतर गावांमध्ये केळी सह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर वरील केळी ही जमीनदोस्त झाली असून लिंबू, मोसंबी यासह इतर फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला…
