Dhule : गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

हॅलो जनता (धुळे) – टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना धुळे (Dhule) तालुक्यातील लळींग शिवारातील पंक्चरच्या दुकानात घडल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लळींग शिवारात मोहम्मद मुजाहीद आलम यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत साडूचा मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (वय १४, रा. बिहार) होता. त्यांच्या दुकानाशेजारीच महेंद्र गॅरेज असून, रोहित राजू चंद्रवंशी आणि शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात. शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना ओळखत होता. गुरुवारी दोघांचे दुकान उघडे होते. (Dhule) सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास मोहम्मद आलम हे घरी गेले होते.
त्याचवेळेस खालीक हा दुकानात एकटा होता. शिवाजी सुळे आणि रोहित चंद्रवंशी यांनी त्या बालकाची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरने हवा भरली. मोहम्मद खालीकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होऊ लागला. शिवाजी आणि रोहित यांनी त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (dhule) दाखल केले. मोहम्मद मुजाहीद दुकानात आल्यानंतर त्यांना घटना समजली. त्यांनीही लागलीच रुग्णालयात धाव घेतली. उपचार सुरू असतानाच खालीक याचा मृत्यू झाला
Dhule: दोघांवर पोस्कोसह खुनाचा गुन्हा दाखल….
या प्रकरणी मोहम्मद मुजाहीद आलम यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानुसार शिवाजी लक्ष्मण सुळे (वय २३, रा. शिंदेनगर, मोहाडी) आणि रोहित राजू चंद्रवंशी (वय २३, रा. लळींग, ता. धुळे) या दोघांविरोधात पोस्कोसह खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच मध्यरात्री दोघा तरुणांना अटक करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
Shivsena : शिंदेंना विधानसभेच्या आधी मोठा धक्का बसण्याची शक्यता, इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात..
Nashik Teachers Constituency : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज दाखल