हॅलो क्राईम
Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

हॅलो जनता न्युज, नाशिक :
Nashik : मकर संक्रांतीचा सण उलटून आता आठ दिवस झाले आहेत, पण तरीही देशभरातील गगनात रंगीबेरंगी पतंगांची उडाण जोशात सुरूच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा आनंद घेणं आवडतं, मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणांत दुर्दैवी घटना घडतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, अपघात होणे, बाईकस्वारांना अपघात होणे, पक्ष्यांना इजा होणे अशी अनेक दुर्घटना नेहमीच समोर येत असतात. याच दरम्यान, नाशिकमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
पतंग उडवताना गच्चीवरून तोल जाऊन एका ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. सोमवारी दुपारी नाशिकच्या काठे गल्ली परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. मृतक मुलाचे नाव नक्ष संदीप बनकर असून तो रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. त्याच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा