Headlines

💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, पुणे : खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे.

‘पुणे शहर पोलिसांनी छाप्यादरम्यान खेवलकरसह सात जणांना ताब्यात घेतले होते आणि नंतर त्यांना भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट, १९८५ अंतर्गत अटक केली होती. पोलिस कोठडीत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर खेवलकरने वकील पुष्कर दुर्गे आणि ऋषिकेश गानू यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला होता. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधील व्हाट्सअप चा सर्व डेटा नाहीसा झाला असून, अशाप्रकारे पुरावा नष्ट झाल्याचा प्रकार घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खेवलकर याला जामीन मंजूर झाल्यास पुराव्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

कोर्टात युक्तिवाद करताना नेमकं काय घडले…

दरम्यान, पोलिसांनी जामिनाला विरोध करणारे लेखी म्हणणे सादर केल्यांनतर त्यावर युक्तिवाद करण्यासाठी बचाव पक्षाने मुदत मागितली होती. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, पोलिसांनी आधीच आरोपपत्र दाखल केले आहे आणि तपास पूर्ण झाला आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, खेवलकर यांच्याकडून कोणतेही प्रतिबंधित पदार्थ जप्त केले गेलें नाहीत. त्यामुळे खेवलकर यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली. विशेष न्यायालयाने तपास अधिकारी, सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत खेवलकरला जामीन मंजूर केला. या प्रकरणात सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚍पाचोरा ते तुळजापूर थेट एस.टी. बससेवा सुरू, भाविकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कला पाहून दादा आणि भाऊ भारावले….

सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

1,375Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION