पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांना जिल्हा युवा पुरस्कार.
या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कमलेश सोनवणे यांनी शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, क्रीडा व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना कमलेश यांनी सांगितले की, या सन्मानामुळे अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून, भविष्यात जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठे काम उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.
या यशाबद्दल जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, के.सी.ई. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सामाजिक क्षेत्रात सोबत काम करण्यास इच्छुकांनी कमलेश सोनवणे यांच्याशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जोडण्याकरिता ९९६०८४२३६९ ह्या नंबरवर संपर्क करावा. तसेच इन्स्टाग्रामवर @kamlesh4india वर कनेक्ट व्हावे असे आवाहन कमलेश सोनवणे यांनी केले आहे.




