Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

हॅलो जनता न्युज, अमळनेर :
अमळनेर (Amalner) येथील पिंपळे रोडवरील कॉलनी परिसरात १५ जानेवारी २०२५ रोजी एक पिसाळलेला कुत्रा रस्त्यावर धुमाकूळ घालण्यात आले. या कुत्र्याने जवळपास १० ते १२ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग निरीक्षक यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, यावर प्रशासनाने कोणतीही तातडीने कारवाई केली नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
अमळनेर (Amalner) शहरातील पिंपळे रोड परिसरात १५ रोजी सकाळी ७ वाजेपासून सुमारे ४ ते ५ लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने इतरही अनेक जणांना चावा घेतला आहे. यातील काहि गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पिंपळे रोडवरील जेडीसीसी बँक कॉलनी, श्रीकृष्ण नगर, आल्हादनगर, सुंदरनगर, वर्धमान नगर, वामन नगर आदी भागातील नागरिकांचा कुत्रा चावलेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत माजी नगरसेवक विवेक पाटील व काहि नागरीकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. परंतु, त्यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊ शकला नाही. त्यामुळे पुन्हा हा कुत्रा इतर नागरिकांनाही आपले लक्ष बनवू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर याबाबत नगर परिषदेने तत्काळ लक्ष देवून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी रास्ता मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’