Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

हॅलो जनता न्युज, अमळनेर :
अमळनेर (Amalner) तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे ४ जानेवारी २०२५ रोजी ३३ वर्षीय महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सरपंचांसह चौघांवर अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोणे बुद्रुक येथे ३३ वर्षीय घटस्फोटित महिला एकटी राहते. ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी गावातील मनीष पाटील आणि सागर बाळू पाटील हे तिच्या घरी आले आणि घरकुलासाठी आधार कार्डाचा फोटो लागेल, असे सांगितले. त्यानंतर सागरने आधार कार्डाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याची माहिती महिलेला तिच्या मावसभावाने सायंकाळी दिली. १४ जानेवारी २०२५ रोजी सरपंच किशोर भाऊसाहेब पाटील, बाळा कैलास पाटील, मनीष पाटील, सागर बाळू पाटील आणि इतर युवक फिर्यादी महिलेच्या घरासमोर उभे होते. महिलेने फेसबुकवर फोटो का पोस्ट केला, याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, राग आल्याने सरपंचाने महिलेला कानात मारले आणि विनयभंग केला. त्यानंतर मनीषने फिर्यादी महिलेचे केस ओढून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी महिलेचे भाऊ व बहीण तिला सोडवायला आले असता सरपंच व मनीष याने त्यांनाही मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडित महिलेने मारवड पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी अण्णासाहेब घोलप करत आहेत.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’