⁠हॅलो क्राईम

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; मुंबई हायकोर्टाने पाच पोलिसांना ठरवले दोषी

हॅलो जनता न्युज, मुंबई :

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणात पाच पोलिसांना दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी होता. त्याच्या एन्काऊंटरमधील तपासात कोर्टाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने मुंबई उच्च न्यायालयाला चौकशी अहवाल सादर केला. फॉरेन्सिक अहवालानुसार, अक्षयच्या बंदुकीवर त्याचे फिंगरप्रिंट्स आढळले नाहीत. न्यायालयीन चौकशीने पोलिसांचा दावा, की अक्षयने गोळीबार केला आणि त्याला स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला, संशयास्पद ठरवला आहे.

अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचा दावा होता की, अक्षयने गोळीबार केल्यामुळे त्याला मारले गेले. मात्र, न्यायालयाने या दाव्याला तडजोड केली असून, ते प्रमाणित होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

“ही बनावट चकमक आहे आणि एकप्रकारची हत्या आहे,” असे अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलांनी सांगितले. मॅजिस्ट्रेटच्या अहवालानुसार, न्यायालयाने आता पुढील कारवाईसाठी पोलिसांवर लक्ष ठेवले आहे.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात दोषी ठरलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे:
– संजय शिंदे (पीआय)
– निलेश मोरे (उपनिरीक्षक)
– हरिश तावडे (हवालदार)
– अभिजीत मोरे (हवालदार)

न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button