Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

हॅलो जनता न्युज, जळगाव :
प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शनिपेठ पोलिसांनी दोन दिवसात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
नायलॉन मांजा हा मानवी जीवनासह पक्षी आणि इतर प्राण्यांसाठीही धोकादायक आहे. या मांजामुळे अनेकदा दुर्घटना घडतात आणि जीवितहानी होते. त्यामुळे राज्य सरकारने नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. मात्र, काही लोक अजूनही चोरून नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पतंग उडवतांना नॉयलॉन मांजाचा वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध होणेसाठी खंडपीठाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
जिल्हा दंडाधिकारी यांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री प्रतिबंधीत केलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणा-याविरुध्द कडक कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सुचना केलेल्या होत्या.
Nylon Manja : दोन दिवसात पाच गुन्हे दाखल
सक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलिसांनी दि. १३ आणि १४ जानेवारी रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करून कारवाई केली. यामध्ये त्यांनी दोन दरम्यान भा. न्या. संहीता कलम ११०, २२३ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ अन्वये “सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न” या सदराखाली ५ गुन्हे दाखल केले आहे.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’