हॅलो सामाजिक

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील

भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख व डॉ. शारदा दशरथ शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले.

बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन तथा अधिसभा सदस्य व्ही. टी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार द्वितीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील मुक्त वैकल्पिक (Open Elective) अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख, प्रा. योगेश सूर्यवंशी, सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश सदाशिवराव देशमुख, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड व प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी लेखकांचे अभिनंदन केले.

या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन विषयाचे सखोल ज्ञान मिळण्यास मदत होणार असून पर्यावरणाबाबत जागरूकता वाढीस लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button