हॅलो सामाजिक

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न सुमित (लकी भाऊ) शिंदे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.

एरंडोल : गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरातील भीमनगर येथे बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवारी (दि. २९ एप्रिल) उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडली. बैठकीत सर्वानुमते सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी समितीची पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी बंटी सरदार, खजिनदारपदी रोहित गायकवाड तर कार्याध्यक्ष म्हणून सागर सरदार, सचिन बोरसे, आकाश इंगळे आणि उमेश बोरसे यांची निवड करण्यात आली.

बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश शिंदे, नितीन बोरसे, उमेश भाऊ शिंदे, रवी बोरसे, अभिषेक शिंदे, संघरत्न गायकवाड, लखन बनसोडे, प्रवीण बाविस्कर, अमोल शिंदे, मनोज बोरसे, राहुल बोडरे, प्रवीण खैरनार, दिनेश बोरसे, मनोहर बोडरे, जितेंद्र बोडरे आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी बुद्धांच्या विचारांचा समाजात अधिकाधिक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि धम्मदान कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दि. १ मे रोजी सकाळी खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, समाजात बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यावर भर राहणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता एरंडोल शहरातून भव्य बौद्ध शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा बुद्धांच्या शांती, करुणा व धम्माच्या विचारांचा प्रसार करणारी ठरणार आहे.

यात्रेनंतर रात्री ९ वाजता सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रम शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button