🛑पाचोरा ब्रेकिंग: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आली जाग, आज रस्ता रोको आंदोलन
हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने अनुदान मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे आज, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जारगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत असल्याने, “विरोधकांना आता का जाग आली?”…
