Headlines

💐 पाचोऱ्यात जल्लोष – २०२५ उत्सवात उर्मिला गोसावी ठरल्या ‘दांडिया क्वीन २०२५’

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोऱ्यातील उत्सवप्रिय वातावरणाला उजाळा देणारा ‘जल्लोष २०२५ उत्सव भक्तीचा, जागरशक्तीचा” गरबा दांडिया रास स्पर्धा’ यंदा मोठ्या जल्लोषात पार पडल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोरअप्पा पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या उत्सवाचे आयोजन होत असून यावर्षीही या महोत्सवाला पाचोरा शहरातील हजारो तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत पारंपरिक वेशभूषा, विविध सामाजिक संदेश देणारे पेहराव आणि नृत्यावरील आकर्षक सादरीकरणामुळे वातावरण रंगले होते. खास करून विविध वयोगटातील स्पर्धकांनी गरबा-रासच्या तालावर दिलेल्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यामध्ये वरिष्ठ गटातील ‘दांडिया क्वीन २०२५’ हा किताब साई नगर, पाचोरा येथील उर्मिला शामराव गोसावी हिने पटकावला. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षकांनी तिची निवड केली.

यावेळी आनंद व्यक्त करताना उर्मिला गोसावी म्हणाल्या,

> “जसा पाचोऱ्यात जल्लोष सुरू झाला तसाच मीही दरवर्षी यात सहभाग घेते. हा उत्सव खरोखरच भक्तीचा जागर आणि शक्तीचा संदेश देणारा आहे. प्रत्येक वर्षी येथे खेळताना अपार आनंद मिळतो. सुमित दादा, सुनीता ताई, प्रियांका दीदी यांनी गरबा खेळताना दिलेले प्रोत्साहनच मला आज ‘दांडिया क्वीन २०२५’ हा मानाचा किताब जिंकता आला. यासाठी मी आयोजक व सहकार्य करणाऱ्या सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे.”

‘जल्लोष २०२५’ उत्सवात रंगतदार स्पर्धा, देखणे पारंपरिक पोशाख, सुमधुर संगीत आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभागामुळे पाचोरा शहरात नवरात्रीच्या उत्सवाला विशेष रंग चढले.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : रावेर तालुक्यात १०८ उपद्रवी हद्दपार, पोलिसांचे प्रतिबंधात्मक पाऊल

🚨 ब्रेकिंग : प्रांजल खेवलकर प्रकरणात खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

🚨 ब्रेकिंग : पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला जळगाव रेल्वे स्थानकाजवळ लागली आग

6,111Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION