हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या माहितीनुसार, गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेता शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) रात्री 11.30 वाजता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
याआधी प्रकल्पातून 17,332 क्युसेक्स पाणी सोडले जात होते. मात्र वाढलेल्या पाणलोटामुळे आता हा विसर्ग वाढवून 19,808 क्युसेक्स (560.57 क्युमेक्स) करण्यात आला आहे. सध्या धरणातील वक्रद्वार क्र. 1, 2, 5 व 6 प्रत्येकी 90 सेंमीने तर वक्रद्वार क्र. 3 व 4 प्रत्येकी 60 सेंमीने उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गिरणा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढणार असून नदीकाठावरील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी सांगितले की, “गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गातही आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.” दरम्यान, नदीकाठावरील शेतकरी व नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात पाऊस सुरूच; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
