🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम : रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर लासगाव येथे घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील युवक-युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल ५१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत समाजासाठी आपला वाटा…
