पाचोरा : एम. एम. महाविद्यालयाचे प्रा. वासुदेव वले यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य निर्णय, मरणोत्तर देहदानाचा संकल्प.
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथील एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. वासुदेव वले यांनी आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. प्रा. वले यांनी आपल्या जीवनाचा एक नवा अध्याय उघडत मेल्यानंतरही इतरांना मदत करता येते,…
