Headlines

🚨 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इतक्या उमेदवारांचे अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सुरू असूनही निवडणूक विभागाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. दरम्यान, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेत उमेदवारांची गर्दी, इतक्या जणांनी दिल्या मुलाखती

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): आगामी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (शिंदे गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या असून, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तसेच भीमशक्ती शिवशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रवीण ब्राह्मणे यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पाचोरा येथे भव्य परिवर्तन मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला तालुक्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या परिवर्तन मेळाव्यात पिंपळगाव, डांभुर्णी, सातगाव, डोंगरी तसेच परिसरातील अन्य गावांतील शेकडो तरुण आणि महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश करून…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, चुकीच्या पंचनाम्यांमुळे अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या पंचनाम्यांमुळे हजारो शेतकऱ्यांना योग्य अनुदान मिळालेले नाही. काही ठिकाणी तर बागायती जमिनींचे जिरायत म्हणून पंचनामे करण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या वास्तविक नुकसानीपेक्षा अतिशय कमी प्रमाणात मदत मिळाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : भाजपाचा परिवर्तन मेळावा, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या मेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन…

Read Full News

🔴पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्यात आज श्री. बालाजी महाराज रथयात्रा, रथोत्सवाची १९० वर्षाची परंपरा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरातील सुमारे १९० वर्षांची अखंड परंपरा लाभलेली श्री बालाजी महाराजांची रथयात्रा आज मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असतात. दुपारी २ वाजता सुरू होणारी रथमिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्याच्या नगरध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, यांना मिळणार उमेदवारी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य निर्धार मेळाव्यात आज शिवसेना शिंदे गटाने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीचा बिगुल वाजवला. या मेळाव्यात पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून, शिंदे गटाने निवडणुकीत आघाडी घेतली आहे. या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : निर्धार मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, भाजप ठाकरे गटाला धक्का

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्यात आज शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊन राजकीय समीकरणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे भडगाव-पाचोरा मतदारसंघात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या मेळाव्याला…

Read Full News

भाजपला मोठा धक्का! निर्धार मेळाव्यात यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश होणार…

हॅलो जनता न्यूज पाचोरा – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज संध्याकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून एक मोठा राजकीय उलथापालथ घडणार आहे. या मेळाव्यात राज्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी,…

Read Full News

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद, जनतेला केले आवाहन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आज पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्या’त सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आमदार पाटील म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION