Raj Thakare : आपल्याला लोकांनी केलेले मतदान गायब झाले – राज ठाकरे

हॅलो जनता न्युज, मुंबई :
राज ठाकरे (Raj Thakare) यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बोलताना मतदानाच्या प्रक्रियेवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यात त्यांनी सांगितलं की लोकांनी मतदान केलं असलं तरी ते मत परिणामांमध्ये दिसत नाही. “लोकांनी मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. असं कुठेही मनात ठेवू नका. मतदान कुठेतरी गायब झालं,” असं ते म्हणाले.
निवडणुका लढवण्याबद्दल त्यांनी विचार व्यक्त करतांना, “अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील, तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असं ते म्हणाले. याशिवाय, त्यांनी राजकीय इतिहासावर प्रकाश टाकला. 1952 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक झाली आणि त्यानंतर संघाची राजकीय विंग जनसंघच्या रूपात जन्मली. 1977 मध्ये इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला आणि नंतर जनता पार्टी स्थापन झाली, ज्यात जनसंघदेखील होता. त्यानंतर, 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली.
राज ठाकरे (Raj Thakare) यांनी भाजपच्या भूमिका बदलाबद्दल स्पष्टता दिली. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोद स्थापन झाला. तसेच, 1980 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली होती, परंतु त्यानंतर शिवसेनेने काँग्रेसविरोधी भूमिका घेतली.
शिवसेनेने 1986 मध्ये काँग्रेसविरोधात भूमिका घेतली, आणि त्यानंतर भाजपसोबत युती केली. त्यांनी सांगितलं की, 1995 मध्ये भाजप-शिवसेनेची युती सरकार स्थापन करतांना, आज अनेक मंत्री शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. राज ठाकरे यांनी वर्तमानपत्राच्या पत्रकारांच्या भूमिकेवरही टीका केली, “आताच्या पत्रकारांचा किती अभ्यास असतो, धन्यच ते,” असं ते म्हणाले.
Amalner Crime : गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पतीचा मोबाईल लांबविला
Trupati Desai : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत तृप्ती देसाईचा गौप्यस्फोट