Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

हॅलो जनता न्युज, जळगाव :
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटल्यानंतरही, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याशिवाय इतर आरोपींवर मोक्का लावला आहे. तसंच, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड ह्याचं नाव समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं असून, यामध्ये संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही (Dhananjay Deshmukh )सहभागी झाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभर विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मस्साजोगमधील आंदोलकांनी आज सकाळपासूनच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान, धनंजय देशमुख यांचा मोबाईल स्विच ऑफ होऊन ते काही वेळापासून गायब होते. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांची अवस्था चिंताजनक होती.
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh ) यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’ आंदोलनाची शंकारामण केली आहे. ते म्हणाले, “मी शांतपणे आंदोलन करतोय, न्याय मागतोय, पण माझा गैरफायदा घेतला जात आहे. मी न्यायाची भीक मागतोय.” त्यांच्या शब्दांत, जोपर्यंत माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझ्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा अधिकार कुणाला आहे?”
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांचे आणखी म्हणणे होतं की, “पोलिसांनी माझी चौकशी अजिबात केली नाही. त्यांनी मला कोणावर संशय आहे का, असं विचारलं नाही. घटनाक्रमाबद्दल काही विचारले नाही. गाडी सापडली, चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीच विचारलं नाही. तपासाबद्दल काही विचारलं जात नाही. जर न्याय मागण्याच्या प्रक्रियेत मला केस दाखल केली जात असेल, तर मग मी न्याय कशासाठी मागतोय?”
Kumbhamela 2025 : कुंभमेळ्याची भव्य सुरुवात; आजपासून प्रयागराजमध्ये शाही स्नानांची धूम
कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा