Amalner Crime : गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पतीचा मोबाईल लांबविला

हॅलो जनता न्यूज, पातोंडा ता. अमळनेर :
एका अज्ञात व्यक्तीने गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पती विजय मोरे यांच्या विश्वासात शिरला आणि त्यांचा मोबाईल चोरून पसार झाला. या चोरीच्या धाडसिक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
अमळनेर तालुक्यातील (Amalner Crime) पातोंडा येथील न्यू प्लॉट भागातील रहिवासी आणि सरपंच मनिषा मोरे यांच्या घरात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सरपंच पती विजय मोरे यांच्याकडे गाडी भाड्याने घेण्यासाठी आले. विजय मोरे घराबाहेर उभे असताना, त्या व्यक्तीने त्यांना गाडी भाड्याने घेण्यास विचारले. त्यानंतर विजय मोरे आणि तो व्यक्ती गाडी घेऊन निघाले. गाडी एका अरुंद गल्लीत थांबवून, त्या व्यक्तीने विजय मोरे यांना त्यांच्या मजुरांना फोन करून बोलवायचं सांगितलं आणि त्याचवेळी विजय मोरे यांच्याकडून मोबाईल मागितला. मोरे गाडी रिव्हर्स करत असताना, तो अज्ञात व्यक्ती मोबाईल घेऊन तिथून पसार झाला.
Amalner Crime : अज्ञात चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
मोरे यांना लगेच मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आले. ते त्या व्यक्तीला शोधत गेले, पण तो दिसला नाही. अखेरीस, मोरे यांनी अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर अज्ञात चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, त्याने पंधरा दिवसांपूर्वी एका गाडी मालकाचा मोबाईल देखील चोरला होता, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Trupati Desai : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत तृप्ती देसाईचा गौप्यस्फोट