हॅलो सामाजिकहॅलो क्रीडाहॅलो शिक्षण⁠हॅलो संवाद

माय भारत केंद्र जळगावच्या पुढाकाराने सारोळा येथे वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न.

सारोळा (ता. पाचोरा) : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), युनिसेफ, यशदा, ग्रामपंचायत सारोळा आणि जिल्हा परिषद शाळा सारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले.

या अभियानास सुधाकर मुंडे (गटविकास अधिकारी), वाल्मिक पाटील (उपसरपंच), अविनाश देशमुख (ग्रामपंचायत सदस्य), गिरीश कोकणी (कृषी विस्तार अधिकारी), विनोद धनगर (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा), नंदकुमार गोराडे (ग्रामसेवक) तसेच अभिषेक चवरे, (जिल्हा युवा अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, जलवायू परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी केलेल्या परिश्रमांचे व समर्पित कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असून भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

या वृक्षारोपण अभियानामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी व स्वयंसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button