Trupati Desai : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत तृप्ती देसाईचा गौप्यस्फोट

हॅलो जनता न्युज, मुंबई :
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरत आहे, विशेषतः बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी झालेली क्रूर हत्या आणि त्यावरून उभ्या राहिलेल्या आरोपांमुळे मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, विष्णू चाटेपासून ते सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडपर्यंत सर्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. खंडणी, अपहरण आणि खूनासारख्या गंभीर आरोपांसह संघटित गुन्हेगारीचा उल्लेख केला जात आहे. या सर्व घटनांमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी धनंजय मुंडे यांना राजकीय वरदहस्त असले, असा आरोप केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, तृप्ती देसाई (Trupati Desai) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, धनंजय मुंडे दिल्लीतील अमित शहांना भेटून त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देसाई यांच्या मते, अमित शहा जास्त काळ महायुतीची बदनामी सहन करणार नाहीत आणि मुंडे यांचा राजीनामा लवकरच होईल. तसेच, बीडची बदनामी त्यांच्या टोळीमुळे झाली असून, जोपर्यंत मुंडे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीडची प्रतिमा खराब होत राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी, देसाई (Trupati Desai) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली आणि त्यांच्या वक्तव्याची पुष्टी केली. “मिकी म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात फक्त पात्र बदलले आहेत,” असे तीव्र शब्दात त्यांनी सांगितले.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय