Chhagan Bhujabal : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा ; छगन भुजबळांचे शरद पवारांवर तिखट आरोप

हॅलो जनता न्युज, मुंबई :
तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांना राजीनामा देण्याची वेळ आली होती. आता, तब्बल 21 वर्षांनी, छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. पुण्यातील जाधव इंस्टिट्यूटमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.
तेलगी घोटाळ्याविषयी प्रश्न विचारल्यावर, छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) म्हणाले, “माझी काही चूक नसताना माझा राजीनामा घेतला गेला.” ते पुढे म्हणाले, “तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यांमध्ये होत होतं, त्यासाठी मी सुप्रीम कोर्टात गेलो. मी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली होती. मी ट्रकभर कागद पुरवले. त्या कागदपत्रांमध्ये माझं नाव कुठेही नव्हतं. ज्या प्रकरणात सीबीआयनेही माझं नाव घेतलं नाही.”
“उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी तेलगी प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं. शरद पवारांना सांगायचं आहे की, साहेब, राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली. तुम्ही जे सांगता की पुढे काय होणार, ते राजकारण होतं. त्या वेळेस तसं काहीच नव्हतं,” असं तिखट सवाल छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्या या आरोपांमुळे तेलगी घोटाळा आणि त्यातील राजकीय गुंतागुंतीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Pune Crime : पुण्यातील महिलेला भोंदू बाबाने 29 लाखांत गंडवले !
Prayagaraj : महाकुंभमध्ये भीषण आग ; आग विझवण्याचे काम सुरू
Raj Thakare : आपल्याला लोकांनी केलेले मतदान गायब झाले – राज ठाकरे