हॅलो सामाजिकहॅलो क्रीडाहॅलो शिक्षण⁠हॅलो संवाद

युवा जलदिंडी अभियान उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

पाचोरा : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), यशदा (महाराष्ट्र शासन), युनिसेफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समृद्ध जन फाउंडेशन तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युवा जलदिंडी अभियान” उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. १ जून रोजी महाविद्यालयाच्या आयसीटी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा) यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण महाले (रासेयो, उ‌.म. वि. जळगाव) अभिषेक चवरे (जिल्हा युवा अधिकारी, माय भारत केंद्र जळगाव), नितीन नेरकर (यशदा ट्रेनर), कमलेश सोनवणे, अविनाश देशमुख, गणेश पाटील, चेतन पाटील, आयुष पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती सोनवणे यांनी केले.

युवा जलदिंडी अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, पाणी बचतीचे महत्त्व आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जलसाक्षरतेची आवश्यकता अधोरेखित करत युवकांनी जलसंधारण चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक,विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या प्रारंभी करण्यात आलेल्या जलपूजन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक संस्था, महाविद्यालय प्रशासन व स्वयंसेवकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button