हॅलो राजकारण

Devendra Fadanvis : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भुसावळ मध्ये जाहीर सभेचे आयोजन

हॅलो जनता (भुसावळ) जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे जिल्ह्यात त प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यावर प्रत्येक पक्षाचा भर असल्याचं पाहायला मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ शहरातील मातृभूमी चौकात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadanvis : शरद पवारांच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष…

रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा जामनेर, मुक्ताईनगर आणि चोपडा येथे नुकत्याच पार पडल्या आहेत. यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह चांगलीच टीका केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमका रावेर लोकसभा मतदारसंघात कुणावर टीका करतात आणि विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Loksabha : जळगाव ग्रामीण मतदारसंघ आम्ही अबाधित ठेवणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून प्रचारात सक्रिय

MVA Karan Pawar : केंद्र सरकारच्या फसव्या योजनांमुळे सर्वांचे मोठे नुकसान, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची टीका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button