हॅलो राजकारण
VBA Jalgaon : जळगावात ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुंपली
हॅलो जनता – जळगाव लोकसभेचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार करण पवार यांना निवडणुकीत हरविण्यासाठी भाजपकडून वेगवेगळी षडयंत्र केली जात असून जळगावात वंचित बहुजन आघाडीचा (VBA Jalgaon) उमेदवार हा भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत केला होता. वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार युवराज जाधव यांचा उमेदवारी अर्ज हा चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात भरला गेला असल्याचे देखील म्हणाले होते.
मात्र या आरोपाला वंचित बहुजन आघाडीचे (VBA Jalgaon) जळगाव लोकसभेचे उमेदवार युवराज जाधव यांनी प्रतिउत्तर देत जर माझा भाजपची काही संबंध संजय सावंत यांनी दाखवला तर मी माझ्या उमेदवारी मागे घेईल आणि जर तसं नसेल तर त्यांच्या उमेदवारांनी राजीनामा द्यावा असं सरळ आव्हान त्यांनी दिल्यामुळे आता जळगावात ठाकरेंच्या सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा संघर्ष पेटला आहे.
Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..
Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…