हॅलो क्राईम
Pune Crime : पुण्यातील महिलेला भोंदू बाबाने 29 लाखांत गंडवले !

हॅलो जनता न्युज, पुणे :
पुणे, (Pune Crime) बालेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका भोंदू बाबाने ज्येष्ठ महिलेला मुलीवरची काळी जादू व वास्तुदोष काढून देण्याचे सांगत तिच्या खात्यातून 29 लाख रुपयात लुटल्याची घटना समोर आली आहे.
Pune Crime : चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल
डिसेंबर महिन्यात फोन करून आरोपीने महिलेला तिच्या घरात दोष असल्याचे सांगितले आणि मुलीवर काळी जादू असल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर महिलेला त्याच्या खोट्या पूजेसाठी पैसे देण्यास सांगितले आणि ऑनलाईन रक्कम जमा केली. महिलेने आरोपीच्या खात्यात एकूण 28 लाख 77 हजार रुपये जमा केले. मात्र, जेव्हा तिने आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन बंद होता. त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय