हॅलो राजकारण
ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…

हॅलो जनता न्युज, पुणे :
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या २३ जानेवारीला (गुरुवारी) झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तो संपूर्ण कार्यक्रम त्यांनी केला.
त्यानंतरही ते दौऱ्यावर होते. शुक्रवारी रात्री पुण्यात आल्यानंतर त्यांना बराच त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांचे पुढील काही दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
“उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – 2025” -अभिजित भांडारकर
ST Mahamandal : एसटी भाडेवाढीने प्रवास महागला, महिलांसाठी 50 टक्के सूट कायम
Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार