हॅलो सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

जळगाव : लोकशाहीर, साहित्यसम्राट, समाजसुधारक, विचारवंत तसेच शोषित, वंचित आणि जनसामान्यांच्या संघर्षाला आपल्या लेखणीतून व शाहिरीतून बुलंद आवाज देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समता, न्याय आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, महानगर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई अंभोरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गिरीश निलेश सांगळे, नरेंद्र साठे, राजुभाऊ गायकवाड, नितीन गायकवाड, पौर्णिमा गायकवाड, नितीन सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या योगदानाला उजाळा देण्यात आला. त्यांच्या समतावादी विचारांचे स्मरण करत समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळत असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button