Headlines

💥 ब्रेकिंग : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगावात भव्य नागरी सत्कार..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – देशभरात आपल्या निर्भीड आणि प्रभावी वकिलकीसाठी ओळखले जाणारे जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती झाली असून, या गौरवामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने जळगावकरांकडून त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजिण्यात आल्याची माहिती ॲड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

हा सत्कार समारंभ २७ जुलै २०२५ रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. कार्यक्रमाचे आयोजन “ॲड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार सोहळा समिती” तर्फे करण्यात आले असून, या समितीमध्ये शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि संस्था प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

उज्ज्वल निकम : अशी आहे कार्यक्रमाची रुपरेषा…

सर्व प्रथम उज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाणार आहे. त्यानंतर जळगाव जी एस मैदानावरून त्यांच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात येणार असून तद्नंतर नागरी सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली आहे.

आयोजित पत्रकार परिषदेत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, जेष्ठ विधीज्ञ सुशील अत्रे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शंभू पाटील यांच्यासह जळगाव शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : जळगावात छावा संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली ही मागणी….

💥 ब्रेकिंग : १५ दिवसांचे बाळ ७० हजारांत विकले, धक्कादायक कारण समोर…

💥 संतापजनक : नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, गळ्यावर चटके अन् वारंवार अत्याचार

1,698Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION