ST Mahamandal : एसटी भाडेवाढीने प्रवास महागला, महिलांसाठी 50 टक्के सूट कायम

हॅलो जनता न्युज, जळगाव :
एसटी महामंडळाने (ST Mahamandal) उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता, जो २४ जानेवारी रोजी मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाला. या निर्णयानुसार एसटीच्या भाड्यात १४.९७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, आणि ही भाडेवाढ शनिवारपासून राज्यभर लागू होईल.
राज्य सरकारने एसटी प्रवासात दिलेल्या सवलती कायम राहतील. महिलांसाठी ५० टक्के सवलत असलेली एसटी तिकीट योजना तसेच सुरू राहील, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले. दिवाळीतील हंगामी भाडेवाढ राज्य सरकारने रद्द केली होती, परंतु वाढत्या तोट्यामुळे एसटी महामंडळाने राज्य सरकारला १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती, तर गेल्या दोन वर्षांत चार वेळा भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
सध्यातरी, एसटी महामंडळात १४,००० बसेस कार्यरत आहेत, आणि दररोज ५५ लाख प्रवासी एसटीच्या सेवांचा वापर करतात. त्यामुळे महामंडळाला दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, उत्पन्न आणि खर्च यातील तफावत लक्षात घेता, दररोज ३ ते ३.५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्यामुळे, महामंडळाला आर्थिक ताण सहन करावा लागतो. म्हणूनच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ST Mahamandal : नवीन भाडेवाढीचे दर असे असतील:
– साध्या बसचे भाडे ८.७० रुपयांवरून ११ रुपये झाले आहे.
– जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचे भाडेही वाढले आहे.
– निमआराम बसचे भाडे ११.८५ रुपयांऐवजी १५ रुपये झाले आहे.
– शिवशाही (एसी) बसचे भाडे १२.३५ वरून १६ रुपये झाले आहे.
– शिवशाही स्लिपर (एसी) च्या भाड्यात वाढ होऊन १७ रुपये झाले आहेत.
– शिवनेरी (एसी) बसचे भाडे १८.५० रुपयांवरून २३ रुपये झाले आहे.
– शिवनेरी स्लिपरच्या भाड्यात २८ रुपयांची वाढ झाली आहे.
Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार
IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर
Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”