Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार

हॅलो जनता न्युज, जळगाव :
जळगाव (Jalgaon burning car) शहरातील लांडोरखोरी उदयानानजीक शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे कारने अचानक पेट घेतला. महानगर पालिकेच्या अग्निशमनव्दारे ही आग विझविण्यात आली. या आगीत चारचाकी जळून खाक झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
आदर्शनगर परिसरातील गुरुमितसिंग हे आपल्या कुटुंबियासह वास्तवाला आहेत. नेहमी प्रमाणे गुरुमितसिंग हे आपल्या कार क्रमांक (एम.एच १९ बीयू ३००१) ने महाबळ परिसरात लांडोरखोरी येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी मोहाडी रस्त्यावर कार उभी केली होती. दरम्यान कारमध्ये शॉर्टसक्रीट झाल्याने सुरूवातीला गाडीतुन धुर निघत असल्याचे निदर्शनास आली आणि क्षणातच कारने पेट (Jalgaon burning car) घेतला. कारने पेट घेतल्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून घटनेची माहीती देण्यात आली. अग्निशमण बंबाचे आगमण होत नाही तो पर्यंत संपुर्ण जळून खाक झाली होती. या आगी मुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत मात्र पोलिसात कुठली ही नोंद करण्यात आली नाही.
IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर
Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”