Headlines

🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील खैरागड, सुईखदान, गंडई जिल्ह्यातील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक तरुणाला अटक केली असून, त्यास छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड-सुईखदान-गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा कलम 66D अन्वये गुन्हा दाखल आहे. हे कलम मुख्यत्वे संगणकीय साधनांचा वापर करून फसवणूक आणि विश्वासघातक गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

सदर गुन्ह्यातील आरोपी गौतम परमानंद पंजाबी (वय 28, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचा मागोवा घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस पथक पाचोऱ्यात दाखल झाले होते. पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील आणि पोलीस अंमलदार संदीप भोई यांनी तत्काळ छापा टाकून आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

पाचोरा पोलीस : आंतरराज्यीय सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश

यानंतर आरोपीला छत्तीसगड पोलिसांचे उपनिरीक्षक शंकर करुणीक, टैलेश सिंह आणि आरक्षक 291 कमलकांत साहू यांच्या स्वाधीन करण्यात आले. पाचोरा पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आंतरराज्यीय सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला पकडण्यात छत्तीसगड पोलिसांना यश मिळाले असून, स्थानिक पातळीवर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण

3,498Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION