आज दिवसभर पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मुलाखती रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहिल्या. एकूण २८ नगरसेवक पदांसाठी तब्बल १५० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याने शिवसेनेतील उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.
पाचोरा निवडणूक : उमेदवार निवडीसाठी हे निकष
मुलाखतीदरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा, सामाजिक कामातील सहभाग, प्रभागाची माहिती, मागील कामगिरीचा आढावा, स्थानिक जनसंपर्क, सामाजिक गणिते तसेच पक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सुद्धा या मुलाखतीत महत्त्वाचे निकष मानले गेले.
शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी सांगितले की, “शिवसेना ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नगरपालिकेत जनतेशी जवळीक ठेवून काम करणाऱ्या आणि पक्षनिष्ठ असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल.” पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मते, या मुलाखतींचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून प्रत्येक प्रभागासाठी योग्य व जनाधार असलेले उमेदवार निवडले जातील. शिवसेनेच्या या पारदर्शक व सुबद्ध पद्धतीने पार पडलेल्या मुलाखतींमुळे पाचोरा शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
🚨पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
🚨 पाचोरा ब्रेकिंग : भाजपाचा परिवर्तन मेळावा, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष…
