🛑 जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, चेअरमन रोहित निकम यांच्या कामाचे कौतुक
हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन रोहित निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राज्यसभा खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी खासदार ॲड. निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यपदी झालेली…
