Headlines

पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात यंदाच्या गणेशोत्सवात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीचा अत्यंत देखणा व आकर्षक देखावा उभारला होता. दरवर्षी वेगवेगळ्या नामांकित तीर्थक्षेत्रांचे देखावे तयार करण्याची परंपरा असल्याने पाचोऱ्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या देखाव्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात…

Read Full News
अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News
ठाकरे सेना

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक नुकतीच पाचोर्‍यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंची सेना घेणार भव्य मेळावा… या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर मतदारसंघात भव्य अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा…

Read Full News
अजित पवार संवाद

💥 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात नेमके काय घडलं?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू (करमाळा तालुका) गावात रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खननाचा तपास सुरू होता. या कारवाईचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा करत होत्या. त्यावेळी NCP कार्यकर्ते व स्थानिकांनी हस्तक्षेप केला. त्या वेळेस “बाबा जगताप” या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अधिकारीच्या हातात फोन सोपवला. या फोन कॉलमध्ये अजित पवारांनी…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी पंचायत समिती सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला पाचोऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण येथील माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पी. एन. पाटील यांनी आज शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आमदार किशोर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. इतकेच नाही तर, या नराधमांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठत अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार चौकशीदरम्यान उघड झाला आहे. पाचोरा तहसीलदारांनी अनुदानाच्या रकमेची वसुली सुरु केल्यानंतर हे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोई याला तडकाफडकी निलंबित केले आहे. असा आहे पाचोरा अनुदान घोटाळा… नैसर्गिक आपत्ती निधीच्या…

Read Full News

💥विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरात कौतिक नगरजळगाव येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच जय हो मित्र मंडळ येथे गणपती उत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये जनरल तपासणी करण्यात आली. जवळपास 110 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झाली. या तपासणी दरम्यान काही रुग्णांचे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION